

Residents in Pune experience chilly mornings as the minimum temperature drops to 11.2°C.
पुणे : शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी (ता. २१) यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने पहाटे आणि रात्री गारठा वाढला आहे. सकाळी उशिरापर्यंत थंडी जाणवत असल्याने पुणेकरांना हुडहुडी भरत आहे. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.