
राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्याची तरतूद करावी, कोरोनाबधित रुग्णांची देयके छाननी समितीकडून तपासून घ्यावीत, रुग्णवाहिकांची उपलब्धता रुग्णांना करून द्यावी, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावा, आदी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना हलगर्जीपणा नको
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी खेड तालुक्यातील महाळुंगे येथील कोविड केअर सेंटर, आळंदी व चांडोली येथील ग्रामीण रुग्णालये, दोन प्रतिबंधित क्षेत्रे, खासगी रुग्णालय आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कोविड केंद्रात रुग्णांवर करीत असलेल्या उपचार पद्धती, रुग्णांकरीता करण्यात आलेल्या सोई-सुविधा, जेवण, औषधोपचार, अँटीजन चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, स्राव पद्धती, ऑक्सिजन पुरवठा, पीपीई किट, रुग्णवाहिका इत्यादींची माहिती घेऊन सूचना केल्या. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले पाटील, सभापती अंकुश राक्षे, आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका चांगले काम करीत आहेत. सर्वांनी अशीच साथ देऊन कोरोना रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावा. रुग्णालयात येणारा प्रत्येकजण कोविड रुग्ण असेल, असे गृहीत धरुन कोरोना चाचणी करा, कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होताच रुग्णांवर उपचार करा.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना हलगर्जीपणा करु नका. प्रतिबंधित क्षेत्राच्या उपयोजना कडक कराव्या. महागड्या औषधांचा हिशोब व्यवस्थित ठेवावा. तालुका स्तरावर विशेष कार्य अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.