esakal | पुणे : आदर्श घालून देणाऱ्या तरुणांचे आयुक्तांनी कौतुक करावे.
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : आदर्श घालून देणाऱ्या तरुणांचे आयुक्तांनी कौतुक करावे.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : घोरपडे पेठ येथील हिना टॉवरमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या गोळीबाराला न घाबरता त्यांना पकडून ठेवले. चोरट्यांच्या दोन हात करून समाजामध्ये चांगला आदर्श घालून देणाऱ्या तरुणांना पोलीस आयुक्तांनी कौतुकाची थाप दिली पाहिेज, अशी मागणी समाजातील सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.

मुस्लीम औकात वेलफेअर ट्रस्ट, अखिल राष्ट्रीय समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धाडसी तरुण आवेज अन्सारी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल, हाजी इकबाल तांबोळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मुश्ताक पटेल यांनी दै. सकाळचे विशेष कौतुक केले. चोरट्यांना न घाबरता त्यांना पकडून ठेवलेल्या तरुणांच्या पाठीवर पोलीस आयुक्तांनी कौतुकाची थाप द्यावी, अशी मागणीही यावेळी यासीन सलौद्दिन शेख, विलास भाऊ दिवाणे यांनी केली.

loading image
go to top