

Pune Traffic
पुणे - पुणे शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तातडीची बाब प्रशासनाच्या विविध विभागांनी ५०० वॉर्डन घेण्यासाठी तातडीने मान्यता दिली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिले. २२५ वॉर्डनची नियुक्तीही पूर्ण झाली आहे. मात्र, या ठेकेदाराबाबत तक्रार आल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी यू-टर्न घेत या ठेकेदाराच्या कामाला स्थगिती देऊन या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.