

PMC Election 2025
sakal
पुणे : दहा विद्यमान नगरसेवकांबरोबरच सात डॉक्टर, ११ वकील, सहा प्राध्यापक यांच्यासह ५० टक्क्यांहून अधिक तरुणांना यंदा प्रथम काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत पाचहून अधिक प्रभागांत चारही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. पक्षाला सोडून गेलेल्या प्रभागांमध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. आघाडीच्या जागा वाटपात पक्षाला आलेल्या शंभरहून अधिक जागांवर पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत.