Loksabha 2019 : भाजपकडून मुक्तपणे गुंडांचा आणि पैशाचा वापर : मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

काही भागात नियमानुसार काँग्रेसने टाकलेले बूथ काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तर काही बूथ बाहेर भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यात असलेल्या रंगाचा मांडव टाकले आहेत. हे आचारसंहितेत बसत नाही. अशाप्रकारे गिरीश बापट यांच्याकडून सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर होत आहे.

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट पोलिस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून ज्या ठिकाणी काँग्रेसची व्होट बँक आहे. विशेषतः झोपडपट्टी परिसर असलेला तळजाई परिसर, सहकारनगर, वडारवाडी या परिसरात पोलिंग एजंट यांना मतदान कक्षात जाण्यास मज्जाव करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली आहे.

पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट यांच्यात लढत होत आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात आला. आज (मंगळवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून, मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

मतदानानंतर मोहन जोशी म्हणाले, की काही भागात नियमानुसार काँग्रेसने टाकलेले बूथ काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तर काही बूथ बाहेर भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यात असलेल्या रंगाचा मांडव टाकले आहेत. हे आचारसंहितेत बसत नाही. अशाप्रकारे गिरीश बापट यांच्याकडून सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर होत आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. रात्रीपासून कुठेही नाकाबंदी नाही..भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी मुक्तपणे पैशाचा आणि गुंडाचा वापर केला आहे..तशी लेखी तक्रारही करण्यात आली आहे.

Web Title: Pune Congress candidate Mohan Joshi targets BJPs Girish Bapat