

Congress Protests Against Injustice to Women in Pune
Sakal
पुणे : भाजपच्या राजवटीत महिलांवर होणारे अन्याय व अत्याचारांची तीव्रता वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने सत्तेत असणाऱ्या भाजप व त्यांच्या मित्र पक्षांतील नेत्यांकडून वारंवार महिलांवर अत्याचार झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या पीडितेला न्याय मिळू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. ३१) शहर जिल्हा काँग्रेस समिती, डॉक्टर सेल व महिला आघाडीच्यावतीने लाल महाल येथे आंदोलन करण्यात आले.