Pune News
sakal
पुणे
Pune News: ‘विकास हवा, पण जीवघेणा नको’; कर्णकर्कश आवाज, बांधकामामुळे होणाऱ्या धुळीने पुणेकर संतापले
Rising Construction Dust and Noise in Pune: पुण्यात वाढत्या बांधकामांमुळे धूळ, आवाज आणि प्रदूषण वाढले आहे. नागरिकांना दमा, खोकला, डोळ्यांतील जळजळ व घशातील संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप केला जात आहे.
पुणे : वाढत्या बांधकामांच्या धुळीने आणि कर्णकर्कश आवाजाने शहर अक्षरशः गुदमरले आहे. खोकला, दमा, ॲलर्जी, ताप, घशातील संसर्ग, डोळ्यांची जळजळ, अशी लक्षणे सर्वत्र वाढत असताना नागरिकांचा थेट आरोप आहे, की महसूलवाढीच्या हव्यासापोटी महापालिका प्रशासन, प्रदूषण मंडळ आरोग्याला दुय्यम स्थान देत आहे.

