बांधकाम व्यावसायिकाला ५० हजार रुपयांचा दंड

बांधकाम व्यावसायिकाला ५० हजार रुपयांचा दंड
Published on

पुणे, ता. ८ : राजा बहादूर मील रस्त्यावर बांधकाम प्रकल्पातील वाहनांमुळे चिखल पसरून दुचाकीस्वार घसरल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने ही कडक कारवाई करण्यात आली.
या परिसरात एका मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू असून, ट्रक आणि डंपरच्या वाहतुकीमुळे मुख्य रस्त्यावर चिखल साचला होता. यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले. अखेर अग्निशामक दलाला पाण्याचा मारा करून रस्ता स्वच्छ करावा लागला. महापालिकेच्या नोटिशीनंतरही दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच स्थिती निर्माण झाल्याने अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी अभियंत्यांची कानउघडणी केली. त्यानंतर व्यावसायिकाने काम थांबवून प्रकल्प ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करण्याचे काम हाती घेतले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि परिमंडळ एकच्या उपायुक्त आशा राऊत यांच्या आदेशानुसार ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने हा दंड वसूल केला. शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी बांधकाम साइटवरील वाहनांमुळे रस्ते निसरडे होत असून, अशा प्रकरणांत क्षेत्रीय कार्यालयांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com