
Pune News: चऱ्होली येथील महेश शेजवळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
तक्रारदार हे बँक ऑफ महाराष्ट्र विश्रांतवाडी शाखेचे खातेदार असून त्यांनी जानेवारी २०१७ मध्ये आर्थिक निर्बंध काळात पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत येथील एटीएम मशिन मधुन दहा हजार रुपये इतकी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत परंतु त्यांच्या बँक खात्यामधून दहा हजार रुपये वजा झाले.