पुण्यात ऑक्सिजन न मिळण्याच्या तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 टोल फ्री नंबर जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen bed

जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन असूनही तो कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

पुण्यात ऑक्सिजन न मिळण्याच्या तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 टोल फ्री नंबर जाहीर

पुणे : जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन असूनही तो कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सिजनचे उत्पादन होऊनही योग्य वितरण होत नसल्यामुळे काही ठिकाणी तुटवडा भासत आहे. भविष्यात रुग्णसंख्येत वाढ होऊन ऑक्सिजनची गरज वाढेल, ही बाब लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्यासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात दररोज १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून, उत्पादकांकडे ७९० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे समितीने कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

हेही वाचा - सासवडला कोरोना समूह संसर्ग बळावला; एका दिवसात उच्चांकी रुग्णवाढीची नोंद

अशी असेल अधिकाऱ्यांची जबाबदारी 

  • निवासी उपजिल्हाधिकारी : जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून नियोजन. 
  • सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन : उत्पादकांशी समन्वय आणि बॉटलिंग प्लॅंटमधून वाटपाचे नियोजन. 
  • महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र : उत्पादनात वाढ आणि उत्पादकांशी समन्वय. 
  • प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे व पिंपरी : वाहतूक-टॅंकर समन्वय राहण्याबाबतचे नियोजन. 
  • उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका : रुग्णालयांना दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना द्यावी. 
  • जिल्हा शल्य चिकित्सक : सर्व रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांना द्यावी. 
  • जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद : सर्व रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदविणे. 

हेही वाचा - वाघोलीमध्ये महामार्गालगत होणाऱ्या वाईन शॉप स्थलांतराला विरोध

जिल्हास्तरीय समितीची कार्ये : 
जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियंत्रण कक्षाला ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, समितीने बॉटलिंग प्लांट्स बल्क सप्लायर्स यांच्या संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी. 

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : दूरध्वनी क्रमांक ०२०- २६१२३३७१ 
एफडीए नियंत्रण कक्ष : दूरध्वनी क्रमांक ०२२- २६५९२३६४ 
टोल फ्री क्रमांक - १८००२२२३६५ 

Web Title: Pune Corona Complaints About Availability Oxygen Pune Collector Announces 3 Toll Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top