मदत राज्य सरकारची, पोस्टर भाजपचे; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका

मदत राज्य सरकारची, पोस्टर भाजपचे; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका

पुणे : कोरोनाचा लढा सुरू असताना राज्य सरकारतर्फे पुणे महापालिकेला मदत केली जाते, सोईस्करपणे ही मदत घ्यायची आणि फक्त भाजपच्याच नेत्यांचे फोटो वापरून पोस्टरबाजी केली जात आहे.यापेक्षा भाजपच्या नेत्यांनी पुण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत आणावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून लसीकरणासंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार सुनील टिंगरे, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक विशाल तांबे, बाबूराव चांदेरे आदी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘भाजपने शहरातील लसीकरण केंद्र ताब्यात घेतले आहेत. सभागृहनेत्यांच्या कार्यालयातून आॅनलाइन नोंदणी केली जात आहे. सर्व यंत्रणा हायजॅक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यासाठी बैठका घेऊन कोरोनाच्या काळात शहराला मदत करत आहेत. पण भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यासाठी काहीही केलेले नाही.

मदत राज्य सरकारची, पोस्टर भाजपचे; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका
पुण्यात लसीकरण फक्त ५० ठिकाणी; नव्याने लस पुरवठा नाही

उच्च न्यायालयात राज्य सरकारने दाखल केलेली माहिती खरी आहे, त्यावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आदळआपट करून नये, अशी टीकाही जगताप यांनी केली.

या टीकेला उत्तर देताना सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, गेल्या १४ महिन्याच्या कालावधीत महापालिकेने काय काम केले याची माहिती घ्यावी आरोप करण्यापूर्वी जगताप यांनी यंत्रणा समजून घ्यावी. पुण्याला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काय करणार ते त्यांनी सांगणे अपेक्षीत होते.’’

राष्ट्रवादीने आयुक्तांकडे केलेल्या मागण्या

  • - १८ ते ४४ गटासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक केंद्र सुर करा

  • - लसीकरणाच्या नियोजनाची माहिती आदल्या दिवशी संध्याकाळीच द्यावी

  • - रेमडेसिव्हीरचा पुरवठा वाढवा

  • - ऑक्सिजन पुरवठा वाढवून सुरळीत करा

  • - लसीकरणाच्या माहितीसाठी कॉलसेंटर सुरू करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com