esakal | पुणे जिल्ह्यात एक लाख सक्रिय कोरोना रुग्ण; दिवसभरात ९९ रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update Pune

पुणे जिल्ह्यात एक लाख सक्रिय कोरोना रुग्ण; दिवसभरात ९९ रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.१३) एक लाखाच्या घरात पोचली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ९९ हजार ९७६ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी २२ हजार ८२६ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात १० हजार ११२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ३१३ रुग्ण आहेत. दिवसभरात ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील ५५ मृत्यू आहेत. दरम्यान, आज ९ हजार ८४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ५७३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७६५ , नगरपालिका हद्दीतील ६२३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार ८३८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार १७३, नगरपालिका हद्दीतील ५९२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १९६ रुग्ण आहेत.

आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पिंपरी चिंचवडमधील २५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १२, नगरपालिका हद्दीतील एक आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा मृत्यू आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ७७ हजार १५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) आहेत. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८ हजार ३३, पिंपरी चिंचवडमधील ५ हजार ५७५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ हजार ३९३, नगरपालिका हद्दीतील २ हजार १९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६३२ रुग्ण आहेत.

loading image