esakal | पुण्यात बाधितांचा दर कमी, पण निर्बंध कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

पुण्यात बाधितांचा दर कमी, पण निर्बंध कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवडपाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (Rural Area) कोरोना बाधितांचा (Corona Patient) दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) हा सात टक्क्यांच्या आता आला आहे. मात्र बाधितांचा दर कमी झाला असला तरी, किमान आठवडाभर ग्रामीण भागातील कडक निर्बंध (Restrictions) कायम राहणार आहेत. ग्रामीणमधील निर्बंध शिथिलतेबाबतच्या निर्णय येत्या शुक्रवारी (ता.२५ ) पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (Pune Corona Patients Rate Decrease But Restrictions Remain)

शहर व पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांचा दर हा दहा दिवसांपूर्वीच पाच टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून या दोन्ही शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातील हा दर दहा टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे येथील निर्बंध अद्याप कायम आहेत. ग्रामीणमधील बाधितांचा दर, आठवडाभरापूर्वी साडेनऊ टक्के, चार दिवसांपूर्वी साडेआठ टक्के झाला होता. तोच आज (ता.२१) सात टक्क्यांच्या आत आला आहे.

हेही वाचा: पुणे : पाणी पुरवठ्याच्या कामाचे मजूर येणार थेट विमानाने

यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच आजही कोरोनाचे कडक निर्बंध लागू आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे दर शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत स्थिती जाणून घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक घेत असतात. मागील सलग दोन आढावा बैठकीत ग्रामीणमधील कोरोना बाधितांचा दर जास्त असल्याने तेथील कडक निर्बंध शिथिल करता आलेले नाहीत.

राज्य सरकारने पूर्वी नियम शिथिल करण्यासाठी बाधितांचा दर किमान दहा टक्के असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे सलग दोन बैठका होईपर्यंत ग्रामीणमधील हा दर दहा टक्क्यांवर आला नव्हता. आता मात्र तो दहा टक्क्यांहून खुपच कमी झाला आहे.

loading image
go to top