esakal | पुणेकरांना दिलासा; नवीन रुग्णांपेक्षा दुप्पटीहून अधिक कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

पुणेकरांना दिलासा; नवीन रुग्णांपेक्षा दुप्पटीहून अधिक कोरोनामुक्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे (pune corona update)- पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत रविवारी (ता.९ ) दुप्पटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणेकरांना कोरोनाच्या दिलासा देणारी ही आकडेवारी ठरली आहे. शहरात आज २ हजार २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट तब्बल ४ हजार ८२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात एकूण ७ हजार ५४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट तब्बल ११ हजार १०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ( pune corona update covid patients discharge double)

हेही वाचा: पुणे : संध्याकाळ आणि पाऊस; समीकरण आजही कायम

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार २०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ८५०, नगरपालिका हद्दीत ५५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९३ नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज १२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५४ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४१, ग्रामीण भागातील २२, नगरपालिका हद्दीतील सहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.