esakal | Pune Corona Update: सलग आठव्या दिवशी नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update
Pune Corona Update: सलग आठव्या दिवशी नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे शहरात आज नव्याने २ हजार ५३८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख २ हजार ६५५ इतकी झाली आहे. दिलासादायक म्हणजे सलग आठ दिवस नव्या रुग्णसंख्येत घट झाली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. शहरातील ४ हजार ३५१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ४८ हजार ६८१ झाली आहे.

आज एकाच दिवसात १६ हजार ११२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २० लाख ५० हजार १६३ इतकी झाली. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४७ हजार ४२० रुग्णांपैकी १,३७१ रुग्ण गंभीर तर ६,६३० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ५५४ इतकी झाली.

पुणे जिल्ह्यात आज नव्या 6 हजार 046 रुग्णांची नोंद झालीये, तर 151 जणांचा मृत्यू झालाय. आज 8 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 98 हजार 786 नवे रुग्ण आहेत. आतापर्यंत 12 हजार 457 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 99 हजार 232 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6 लाख 88 हजार 158 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.