esakal | Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच

Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : शहरात काल नव्या ७३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर आज पुणे शहरात आज नव्याने ६८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ४ लाख ६७ हजार ५४१ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार १५८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५१ हजार ०७० झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ८ हजार ३५६ रुग्णांपैकी १,०२० रुग्ण गंभीर तर २,१२४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ७५१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ६० हजार ५१६ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ११५ इतकी झाली आहे. (Pune Corona Update less than thousand patients in Pune Today)

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांनी मंगळवारी (ता.२५) दहा लाखांचा आकडा पार केला आहे. काल (मंगळवारी) पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १० लाख ३३० झाली आहे. एकूण रुग्ण संख्येत शहरातील ४ लाख ६६ हजार ८५८ रुग्ण आहेत. गेल्या सुमारे सव्वा वर्षातील ही आकडेवारी आहे. या सव्वा वर्षाच्या काळात १६ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ६४२ रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जात आहे. राज्यात आज 24 हजार 752 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 23 हजार 065 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 52 लाख 41 हजार 833 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3 लाख 15 हजार 042 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता 92.76% झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 453 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्याचा मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.