esakal | पुण्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ; 24 तासात 6 हजार जणांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : पुण्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे शहरात आज नव्याने ३ हजार ८७१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या आता ४ लाख ६ हजार ५२६ इतकी झाली आहे. शहरातील ६ हजार १५९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ५४ हजार ८४० झाली. आज एकाच दिवसात १६ हजार ६५० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २० लाख ६६ हजार ८१३ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४५ हजार ०७५ रुग्णांपैकी १ हजार ३६८ रुग्ण गंभीर तर ६ हजार ७१४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ५७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ६११ इतकी झाली आहे

हेही वाचा: भयानक! जगाच्या 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 67 हजार 752 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी 895 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सोमवारी राज्यात 48 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण सापडले होते. सर्वसाधारणपणे राज्यात 60 हजारांच्या पुढे कोविड रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या स्थिरावताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

loading image