esakal | Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली
Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुणे महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत ४,८९५ नवे रुग्ण सापडले आहेत. काल ३,९७८ रुग्ण आढळले होते. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,१५,३९९ वर पोहोचली आहे. पुण्यातील ४,६८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील ३,६४,४६४ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात आज २०,५०१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह पुण्यातील एकूण चाचण्यांची संख्या ही २१,०७,५९१ वर पोहोचली आहे. पुण्यात आज 63 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह पुण्यातील एकूण मृतांची संख्या ही ६,७३२ वर पोहोचली आहे.

हेही वाचा: पुणे मनपातील अधिकाऱ्यांची 'रंगीत ओली पार्टी'; पोलिसांच्या छाप्यात 9 जण अटकेत

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ७३२ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४४ हजार २०३ रुग्णांपैकी १,३९२ रुग्ण गंभीर तर ६,६९५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात २० हजार ५०१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २१ लाख ०७ हजार ५९१ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ६८८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ६४ हजार ४६४ झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख १५ हजार ३९९ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्याची काय आहे परिस्थिती?

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील चाळीस लाखांहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी (कोविड टेस्ट) करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ८ लाख २९ हजार ५०५ जणांना कोरोनाची बाधा ( कोरोना पॉझिटिव्ह) झाल्याचे या चाचणी अहवालातून दिसून आले आहे. यानुसार कोरोना चाचणी घेण्यात आलेल्यांपैकी २०. ७० टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात आज ११ हजार ८७२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत शहरातील ४ हजार ८९५ नवे रुग्ण आहेत. शिवाय ९ हजार ३६७ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य १६३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील ६३ मृत्यू आहेत. आजअखेरपर्यंत घेण्यात आलेल्या एकूण कोरोना चाचण्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २१ लाख ७ हजार ५९१ चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील १० लाख ५८ हजार ६४३, ग्रामीण भागातील ६ लाख ४८ हजार ३४५, नगरपालिका क्षेत्रातील १ लाख ५२ हजार ६६७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३८ हजार ७७३ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांत पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ५१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३ हजार ५५४, नगरपालिका हद्दीत ८०५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १०२ नवे रुग्ण सापडले आहेत. आज पिंपरी चिंचवडमधील ४९, ग्रामीण भागातील ३३, नगरपालिका क्षेत्रातील १३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.