Pune Corona Update : शहरात नवे ५,३७३ रुग्ण; ५४,६२४ रुग्णांवर उपचार सुरु

Pune Corona Update : शहरात नवे ५,३७३ रुग्ण; ५४,६२४ रुग्णांवर उपचार सुरु

पुणे : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या कहराने आपलं डोकं वर काढायला सुरवात केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक मानली जात आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत आहे. आज पुणे शहरामध्ये जितके नवे रुग्ण आढळले आहेत, जवळपास तितकेच रुग्ण बरे झाले आहेत, ही तशी दिलासादायक बाब आहे. आज पुणे शहरामध्ये नव्या ५,३७३ रुग्णांची भर पडली. पुणे शहरातील आजवरची एकूण रुग्णसंख्या आता ३ लाख ५४ हजार ७९७ इतकी झाली आहे. शहरातील ५ हजार ०४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ९४ हजार १७१ झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ००२ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५४ हजार ६२४ रुग्णांपैकी १,१९६ रुग्ण गंभीर तर ५,०४९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात २३ हजार ५६४ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १८ लाख ३२ हजार १५७ इतकी झाली आहे.

Pune Corona Update : शहरात नवे ५,३७३ रुग्ण; ५४,६२४ रुग्णांवर उपचार सुरु
पुणे मार्केटयार्डमधील गर्दीला बसणार वेसण; ओळखपत्राशिवाय 'नो एन्ट्री'

पुणे कोरोना अपडेट

◆ उपचार सुरु : ५४,६२४

◆ नवे रुग्ण : ५,३७३ (३,५४,७९७)

◆ डिस्चार्ज : ५,०४९ (२,९४,१७१)

◆ चाचण्या : २३,५६४ (१८,३२,१५७)

◆ मृत्यू : ५१ (६,००२)

पुणे शहरामध्ये काल दिवसभरात १९ हजार २१९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले होते. तर पुणे महानगरपालिका हद्दीत काल दिवसभरात १८६ केंद्रांवर १९ हजार २१९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले होते. पुण्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. आता सोमवारी सकाळी ७ पर्यंत काय निर्बंध असतील. कारण राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune Corona Update : शहरात नवे ५,३७३ रुग्ण; ५४,६२४ रुग्णांवर उपचार सुरु
पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूनी एकाच दिवशी ओलांडला शंभराचा आकडा

जिल्ह्यात काय आहे परिस्थिती?

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात १० हजार ९६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ३७३ जण आहेत. जिल्ह्यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ५१ मृत्यू आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा शंभराहून अधिक झाला आहे. गेल्या वर्षभरात काल (गुरुवारी) पहिल्यांदाच जिल्ह्यात एका दिवसातील कोरोना मृत्यूचा आकडा ११४ झाला होता. गुरूवारच्या तुलनेत मृत्यूची संख्या पाचने कमी झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ९९ मृत्यू झाले होते. दरम्यान, आज १० हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ४९ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ८७२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ६९७, नगरपालिका हद्दीतील ५०२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजच्या एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार ५२९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ३८४, नगरपालिका हद्दीतील ५६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १११ रुग्ण आहेत. सद्यःस्थितीत २४ हजार ५०८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ७४ हजार ९२३ गृहविलगीकरणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com