esakal | Pune Corona Update: दिलासादायक! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update: दिलासादायक! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक
Pune Corona Update: दिलासादायक! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुणे शहरात सध्या ४४,०५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज ३,९७८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या नव्या रुग्णांसह आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,१०,५०४ वर पोहोचली आहे. आज ४,९३६ रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ३,५९,७७६ वर पोहोचली आहे. पुण्यात आज २०,२७७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह पुण्यातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही २०,८७,०९० वर पोहोचली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ६६९ इतकी झाली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रासाठी खुशखबर! सर्वांना मिळणार मोफत लस

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४४ हजार ०५९ रुग्णांपैकी १,३७९ रुग्ण गंभीर तर ४,९३६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात २० हजार २७७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २० लाख ८७ हजार ०९० इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ९३६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ५९ हजार ७७६ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद ! पुणे शहरात आज नव्याने ३ हजार ९७८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख १० हजार ५०४ इतकी झाली आहे.