esakal | पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; वीकेंड लॉकडाउनचा चांगला इफेक्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; वीकेंड लॉकडाउनचा चांगला इफेक्ट!

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; वीकेंड लॉकडाउनचा चांगला इफेक्ट!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय रविवारच्या (काल) तुलनेत आज (ता.१९) दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची तीन हजारांहून अधिकने कमी झाली आहे. जिल्ह्यात आज ९ हजार ५८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील ४ हजार ५८७ जण आहेत. जिल्ह्यातील १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरातील ५४ मृत्यू आहेत. जिल्ह्यात आज १० हजार ५६६ जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये पुणे शहरातील सर्वाँधिक ६ हजार ४७३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १ हजार ९८०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ६१६, नगरपालिका क्षेत्रातील ३१५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १८२ जण आहेत. आतापर्यंत तब्बल सहा लाख १८ हजार १६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण

हेही वाचा: पुण्यात हजारो बांधकाम मजूर सरकारी सुविधांपासून वंचित

आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार २७९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार १५८, नगरपालिका हद्दीतील ४६३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९५ रुग्ण आहेत. आज पिंपरी चिंचवडमध्ये ३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ११, नगरपालिका हद्दीत तीन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत २७ हजार ५३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ७५ हजार ४७६ जण गृहविलगीकरणात आहेत.