पुणे : गणेशोत्सवात मिरवणुकीवर बंदी

पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर
ganpati
ganpatisakal
Updated on

पुणे : कोरोनाच्या (corona)संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही पुण्याच्या (pune) वैभवशाली गणेशोत्सवावर बंधने आली आहेत. गर्दी जमू नये म्हणून ढोल-ताशांच्या ठेक्यावर प्राणप्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुका काढण्यावर बंदी घातली आहे. गणेशोत्सवात जास्त भपकेबाजी न करता सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आदेश महापालिका (pune corporation) प्रशासनाने सोमवारी काढले आहेत. (pune corporation order Ganeshotsav)

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये मंडळांना मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. मंडळांची मूर्ती चार फुटापेक्षा जास्त असू नये. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटापर्यंत असावी, गणपतीच्या आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जनापूर्वी ‘श्रीं’ची घरीच आरती करून विसर्जन घाटावर यावे. घाटावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

ganpati
मुंबई- पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळ

या आहेत मार्गदर्शक सूचना...

  • गणेश मंडळांना महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार

  • मंडळांनी लहान मंडप घालावेत

  • सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी

  • उत्सवाकरिता देणगी, वर्गणी ऐच्छिक असावी

  • आरती, भजन, कीर्तनासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी

  • भाविकांना गणपतीचे आॅनलाइन दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करावी. घरगुती गणपतीसाठी शक्यतो शाडूची मूर्ती वापरावी, विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. घराबाहेर विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करावा

  • ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना विसर्जनस्थळी आणणे टाळावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Agriculture Day celebrated at Ghodegao, Ambegaon with a focus on modern farming techniques and farmer recognition
Three Held, Minor Detained as Pune Police Solve Nine Burglary Cases Across Two States
From Darkness to Light: Eye Donation Ends Six Decades of Blindness
Pune Rural Police Bust Ganja Racket, Arrest One with Illegal Narcotics in Loni
Marathi News Esakal
www.esakal.com