esakal | 'डीएसके विश्व' समस्यांच्या गर्तेत; कोट्यवधींचा कर तरी सुविधांची वानवा
sakal

बोलून बातमी शोधा

dsk

'डीएसके विश्व' समस्यांच्या गर्तेत; कोट्यवधींचा कर तरी सुविधांची वानवा

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : पुणे महानगरपालिका (pun corporation) हद्दीत समावेश होऊन तीन वर्षे उलटून गेली तरीही अद्याप कोणत्याच मुलभूत सुविधा पालिकेकडून मिळत नसल्याने 'डीएसके विश्व' (dsk) येथे राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. करोडो रुपयांचा कर भरुनही नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने येणाऱ्या पालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा नागरिकांनी 'सकाळ'शी बोलताना दिला आहे. ((pune corporation taking crore tax but dsk world lack facilitie)

पुणे शहराच्या पश्चिमेस धायरी व किरकटवाडी या दोन गावांच्या हद्दीत मिळून ३८०० सदनिका असलेले डीएसके विश्व आहे. यातील सप्तसूर, भास्करा, वसूधा, वरुणपवन या सोसायट्या धायरी हद्दीत तर चंद्रमा, रोहीनी, आकाश, सायंतारा व मेघमल्हार या सोसायट्या किरकटवाडी गावच्या हद्दीत आहेत. सध्या सुमारे बारा ते पंधरा हजार लोक येथे वास्तव्यास आहेत. यातील धायरी गावच्या हद्दीत असलेल्या सोसायट्यांचा २०१७ साली पालिका हद्दीत समावेश झाला आहे. तेव्हापासून येथील नागरिकांनी करोडो रुपये कर पालिकेला दिला आहे मात्र अद्याप त्याबदल्यात मुलभूत सुविधा देखील नागरिकांना मिळाल्या नाहीत. पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने वार्षिक दहा ते पंधरा लाख पाण्यासाठी खर्र करावे लागत आहेत. कचरा उचलण्यासाठीही पालिकेने व्यवस्था न केल्याने नागरिकांनाच खर्च करावा लागत आहे. पालिकेचा आरोग्य विभागही या परिसराकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये प्रसंगी कडक लॉकडाउन

नागरिकांच्या प्रतिक्रिया

" तीन वर्षे होऊन गेली धायरी गावचा पालिकेत समावेश होऊन. पालिकेला आम्ही कर भरतो, किमान पिण्यायोग्य पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हायला हवा."

-प्रथमेश कुलकर्णी, रहिवासी, डीएसके, विश्व, धायरी.

"ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही सेवा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. येथून शहरातील मुख्य ठिकाणी जाण्यासाठीसुद्धा वेळेत बस उपलब्ध नाहीत."

-रत्नाकर फाटक, ज्येष्ठ नागरिक, डीएसके विश्व.

"रस्त्याच्या कडेला अंधारात प्रेमी युगुलांचे अश्लिल चाळे सुरु असतात. पथदिव्यांचीही सोय नाही. पोलीस केवळ दुकानांच्या पावत्या पाडण्यासाठी येतात. गस्त वाढवणे आवश्यक आहे."

-मृणाली उल्हास पाटील, व्यावसायिक, डीएसके विश्व.

"डास प्रतिबंधक धूर फवारणी किंवा जंतुनाशक फवारणी केली जात नाही. एवढी मोठी लोकवस्ती असतानाही येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र नाही. दूर अंतरावर असलेली लसीकरण केंद्रे आणि तेथील गर्दी यामुळे येथील अनेक ज्येष्ठ नागरिकांना अद्याप लस मिळालेली नाही."

-विनायक जोशी, डीएसके विश्व फेडरेशन सदस्य.

हेही वाचा: पुण्यातील ओशो आश्रमातील साधकांनी केले गंभीर आरोप

डीएसके विश्व फेडरेशन अध्यक्ष डॉ. आनंद पाटील म्हणाले, "अधिकारी, पदाधिकारी या सगळ्यांकडे पाठपुरावा करुन अक्षरशः थकलो आहोत. केवळ आश्वासनने मिळतात. आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधाही मिळत नसल्याने येणाऱ्या मनपा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालणार आहोत."

"प्रत्यक्ष डीएसके विश्व येथे जाऊन पाहणी करणार आहे. पाणी पुरवठ्यासंबंधी असलेली अडचण संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून सोडवण्यासंबंधी उपाययोजना करण्यात येतील. कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल," असे पुणे मनपा सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.जयश्री काटकर यांनी सांगितले.

loading image
go to top