कामांची लगीनघाई फक्त सोशल मीडियावर; गल्लीबोळी सुविधांपासून कोसो दूर

संताप व्यक्त करत नागरिकांनी मतदान न करण्याचा पवित्रा हाती घेतला
damaged Drainage
damaged Drainagesakal
Updated on

कँटोन्मेंट : एकीकडे प्रभागातील प्रतिनिधी निवडणुकांच्या तोंडावर आपल्या कामाचे बिगुल वाजवत मुख्य रस्त्यावरील कामे उरकून सोशल मीडियावर फोटो बाजी करताना व्यस्त आहे तर दुसरी कडे गल्लीबोळातील नागरिक मात्र मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.

भवानी पेठ कासेवाडी परिसरात 10 नंबर कॉलनी येथे ड्रेनेज लाईन व गल्लीबोळातील रस्ते उंदीर घुशीनीं पोखराल्याने नागरिक हैराण झाले आहे. यावेळी भागात एकही नगरसेवक फिरकत नसल्याने महिला नागरिकांनी संताप व्यक्त करत यंदा मतदान न करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून म्हसोबा मंदिर परिसराच्या अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याची व्यथा यावेळी महिलांनी बोलून दाखवली. परिसरात विविध कामांचे टेंडर काढून सामान्य जनता व महानगरपालिकेची दिशाभूल नगरसेवक करत असल्याचा आरोप ही यावेळी नागरिकांनी केला आहे.

नगरसेवकांच्या कामाचे पाच वर्षे सरले, पुढील निवडणुकाही तोंडावर आल्या तरी देखील अजूनही नगरसेवकांनी दिलेला बोगस आश्वासनांचा पाऊस मात्र थांबला नाही. त्यात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे खेटे मारूनही अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांच्या समस्येकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात मते मागण्यासाठी कोणीही येऊ नये, अशी तीव्र भावना यावेळी रहिवाशांनी व्यक्त केली आहे

कोट:

हमीदा अब्दुल हमीद अलमैलकर :

या भागात गेल्या अनेक वर्षापासून गल्लीत एकही काम झाले नाही. रस्त्यांची दुर्दशा त्यात रात्री अपरात्री उंदीर व घुशीनीं थैमान घातले आहे. रात्री झोपण्याची भीती वाटते. अनेकदा हाता, पायावर व शरीराच्या अनेक भगांवर घुशी चावा घेतात. .माझे डोक्यावरचे केस ही कुतरडले आहे. दररोजचा हा असाच प्रसंग असतो. पावसाळ्यात तर त्याहून भयानक परिस्थिती ओढवते..

फेमिदा मलंग शेख:

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. ड्रेनेज लाईन सतत तुंबत असल्याने पाणी जाण्यासाठी जागाच नसते दरम्यान एकमेकांच्या घरात व दारात हे घाण पाणी साचते. त्यामुळे दररोज शेजाऱ्यांबरोबर या कारणास्तव झालेले छोटे वाद मोठे विवाद निर्माण करतात.

सायरा नजीर शेख:

आमच्या दारात तर चेंबर ची सुविधाच नाही. त्यामुळे रस्त्यावर आदीच खड्डे असल्याने सर्व पाणी जमिनीत मुरून पुन्हा घरात शिरत असते. अनेकदा क्षेत्रीय कार्यालय कडे तक्रार करण्यात आली. अद्याप दखल कोणीच घेत नाही.

नुरअख्तर सय्यद पिरजादे:

गेल्या अनेक वर्षात एकदाही चेंबर स्वच्छ करण्यासाठी एकही कर्मचारी आले नाही. याभागात नियमित स्वच्छता ही होत नाही. त्यामुळे तुटके फुटके असलेले चेंबर मध्ये कचरा जाऊन ते अधिकच तुडुंब भरत असते.

अजिझा फकीर पिरजादे:

या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. त्यात माझ्या नळाला तर पाणीच येत नाही. अनेक ठिकाणी संथ गतीने पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे घरातील कामे ही वेळेवर होत नाही.

सिंधुबाई माने:

माझे वय पंच्याहत्तरी ला टेकले. मात्र हवा तसा विकास अजून या भागात झालेला दिसत नाही. गल्लीची बोळ लहान आहे. त्यामुळे एक कुत्र देखील माझ्या या बोळात फिरकत नाही. पूर्वी होत्या त्या फरशा देखील फोडल्या आहेत. त्यामुळे या जागेतून वाट काढताना बरीच कसरत करावी लागते. ड्रेनेज लाईन ची तर अजिबात सुविधा नाही.

मंदा गवळी:

बंधुभाव मित्र मंडळाच्या परिसरात ड्रेनेज लाईन करिता दोन टेंडर काढण्यात आले आहे. परंतु एकाचे ही काम त्याठिकाणी झाले नाही. टेंडर काढूनही काम न करण्याची पद्धत सध्या या भागात सुरू झाली आहे.

नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले कि, त्या भागातील टेंडर दुसऱ्या नगरसेवकांनी काढले होते. त्या नगरसेवकांनी सांगितले की, आम्ही त्याठिकाणी काम करतोय मात्र अद्याप कामच झालेच नसेल तर येणाऱ्या काही दिवसात काम पूर्ण करून घेतले जाईल.

नगरसेविका मनीषा लडकत: अनेक चेंबर हे घराच्या आत गाडले गेले आहे. त्यामुळे स्वच्छ करताना किंवा नवीन लाईन टाकताना ते सापडत नाही. याचा पाठपुरावा वेळोवळी क्षेत्रीय कार्यालय कडून करण्यात आला आहे.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी गणेश सोनुने हे कार्यालयात उपस्थित नसतात. त्यांच्या कडे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा भार आहे. तसेच भवानी पेठ चा अतिरिक्त भार आहे. मोबाईल वरून संपर्क साधल्यास ते कॉल उचलत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com