Pune Corporation : आर्किटेक्‍टचे शुल्क महापालिका ठरवू शकत नाही

गुंठेवारीचे प्रकरण दाखल करताना आर्किटेक्टने पाच हजारापेक्षा जास्त शुल्क घेऊ नये अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे : गुंठेवारीचे प्रकरण दाखल करताना आर्किटेक्टने पाच हजारापेक्षा जास्त शुल्क घेऊ नये अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केली आहे. त्यास काँग्रेसचे माजी आमदार अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी आर्किटेक्टचे शुल्क ठरविण्याचा अधिकार महापालिकेला नाही, हे पत्रकाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. (Pune Corporation News Updates)

राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीतील अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी प्रस्ताव दाखल करून घेतले जात आहेत. नागरिकांनी हे प्रस्ताव आर्किटेक्टच्या माध्यमातून आॅनलाइन सादर करावेत असाही नियम आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुंठेवारीची माहिती देताना नागरिकांना आर्किटेक्टकडून प्रस्ताव दाखल करायचे असले तरी आर्किटेक्टने नागरिकांकडून पाच हजारपेक्षा जास्त शुल्क घेऊ नये असे सांगितले होते.

pune municipal corporation
५१ लाखांचे अवैध चलन बाळगणाऱ्या प्रवाशाला दिल्लीत अटक

आर्किटेक्टस ॲक्ट ७२ मध्ये आर्किटेक्टना व्यावसायिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या व्यवसायासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कॉन्सील आॅफ आर्किटेक्चर ही शिखर संस्था आहे. आर्किटेक्टच्या शुल्कासंदर्भात काय शुल्क असावेत ते बंधन घालण्याचा अधिकार महापालिकेला नाही, याची नोंद महापौरांनी घ्यावी असे गाडगीळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water crisis in ambegaon tehsil
IITM and ARIES Sign MoU
Pune
Pune
Marathi News Esakal
www.esakal.com