esakal | बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनला
sakal

बोलून बातमी शोधा

pune corporation file photo

बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनला

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरातील अॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्यावरून वाद निर्माण झालेला असताना नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाला महापालिकेची जागा ९० वर्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी विरोधीपक्षासह सत्तेतील रिपाइने प्रस्ताव दिला होता. पुणे महापालिकेने म्हणजे १९२४ मध्ये पुणे नगरपालिकेने ९० वर्षांपुर्वी नाना पेठेतील जागा डिस्प्रेड क्लास मिशनला नाममात्र भाडेकराराने दिली होती.

डिस्प्रेड क्लास मिशनच्या माध्यमातून याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूल चालविण्यात येते. या शाळा आणि महाविद्यालयामध्ये तळागाळातील तसेच बहुजन वर्गातील लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून अनेक पिढ्या साक्षर झाल्या आहेत.

२०१४ मध्ये ९० वर्षाचा करार करार संपला असून, महापालिकेकडून संस्थेला करार वाढवून देण्याबाबत कोणतीही हालचाल केली जात नाही. त्यामुळे, संस्था, विद्यार्थी-पालकांपुढे चिंता आहे. त्यामुळे, या संस्थेस देण्यात आलेल्या जागेचा करार हा पूर्वीच्याच दराने आणि आणखी ३० वर्षांसाठी वाढवून देण्यात यावा, असा प्रस्ताव विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रशांत जगताप यांनी दिला होता.

तर उपमहापौर सुनिता वाडेकर आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी देखिल या संस्थेला पुर्वीच्याच भाडेदराने शाळेची जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला संस्थेला ९० वर्षे भाडेकराराने जागा देण्यात यावी आणि प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात यावी, अशी उपसूचना देण्यात आली. या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

बाबासाहेब आंबेडकर यांची भेट

या शिक्षण संस्थांना राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यांनी अनेक बैठका, सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या संस्थेच्या कार्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. १९१४ मध्ये केलेला हा करार पुन्हा केला जावा यासाठी प्रस्ताव आल्यानंतर त्यास त्वरित मान्यता देण्यात आली.

loading image
go to top