पुणे : रिंगरोडची पूर्व भागातील मोजणी अंतिम टप्प्यात

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील मोजणीचे काम पूर्ण होत आले आहे.
pune ring road
pune ring roadsakal
Summary

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील मोजणीचे काम पूर्ण होत आले आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) (MSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या (Ringroad) पूर्व भागातील मोजणीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पश्‍चिम भागाप्रमाणेच पूर्व भागातील रिंगरोडसाठी भूसंपादनाचा (Land Acquisition) मोबदला निश्‍चित करण्याची प्रक्रिया पुढील टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे.

खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यातून जाणारा हा रस्ता सुमारे ६६ किलोमीटर लांबीचा असणार आहे. तसेच, त्याची आखणी करताना पुरंदर येथील नियोजित विमानतळापर्यंत रस्ता नेण्यात येणार आहे. पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. नगर रस्त्यावरील मरकळपासून हा रस्ता सुरू होणार असून, पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. एकूण ४३ गावांतून हा रिंगरोड जातो. याची मार्गिका निश्‍चित करण्यासाठीचे आदेश काढण्यास राज्य सरकारकडून सहा महिने उशीर झाला. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या रिंगरोडच्या मार्गिका मोजणीचे काम सुरू झाले असून, लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात भूसंपदनासाठीचा मोबदला निश्‍चितीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच, त्यास राज्य सरकारकडून मान्यता मिळाली असून, या मार्गाच्या भूसंपादनाचे कामही सुरू झाले आहे.

pune ring road
पर्यटनादरम्यान निष्काळजीपणामुळे पर्यटकांसोबत अपघात होण्याच्या घटना घडतात

...असा आहे पूर्व भागातील रिंगरोड

‘एमएसआरडीसी’कडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मुळ, सानोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रुक असा असणार आहे.

पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचा मोबदला निश्‍चित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पूर्व भागातीलदेखील मोजणीचे काम सुरू असून, लवकरच तेथील भूसंपादनाचा मोबदला ठरविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com