
पुणे : जोडप्याचा २३ वर्षांचा संसार. पत्नी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास. वैचारिक मतभेदातून दोघांमध्ये वाद झाले. त्यामुळे तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा करण्याबरोबरच वेळोवेळी पतीला दिलेले ५६ लाख रुपये त्याच्याकडून परत मिळण्याची मागणी केली. पतीला रक्कम व्यवहारासाठी दिली की संसारासाठी, याचा कोणताही दाव्यात उल्लेख नसल्याने कौटुंबिक न्यायालयाने रक्कम परत करण्याचा अर्ज फेटाळत दोघांचा घटस्फोट मंजूर केला.