

Domestic Violence Case Dismissed: Pune Court Rejects NRI Wife’s Plea Over Lack of Territorial Authority
पुणे : कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या एका पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा दावा अधिकार क्षेत्र नसल्याने फेटाळून लावला. पत्नीने दाखल केलेला दावा न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, तसेच मालकी हक्काचा पुरावा न्यायालयाचे कार्यक्षेत्रात ठरवू शकत नाही, असे नमूद करत खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी हा निकाल दिला.