Pune Court Chooses Community Service Over Jail
पुणे : मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याऐवजी न्यायालयाने समाजसेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५५ अंतर्गत दोन्ही आरोपींना एकूण चार दिवस दररोज तीन तास समाजसेवा करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी दिला आहे.