पुण्यात कोरोनाच्या आढावा बैठकीत काय ठरलं? केंद्राकडून मिळणार व्हेंटिलेटर्स

pune covid review meeting ajit pawar prakash javadekar
pune covid review meeting ajit pawar prakash javadekar

पुणे : देशात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. शहरात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कालपासून लॉकडाऊन नियमांचं पालन करण्यात येत आहे. शहरातील परिस्थिती आणि रुग्णांची संख्या या पार्श्वभूमीवर आज, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक झाली. त्यात केंद्र सरकारकडून पुण्याला मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. आम्हाला लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत राजकारण करत नाही. जेव्हा करायचं तेव्हा करतो, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, पुण्यात काही ठराविक हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. काही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये उपचारांसाठी आग्रह धरला जात आहे. त्याठिकाणी तुटवडा आहे, असं पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात आता काय होणार?

  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न असणार
  • पुण्याला केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार
  • व्यापाऱ्यांशी उद्या महापालिका आयुक्तांसह अधिकारी चर्चा करणार
  • व्यापाऱ्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देणार
  • संरक्षण खात्याची हॉस्पिटल उपलब्ध करून देणार
  • कोरोना प्रतिबंध लसीकरण वाढवणार

महाराष्ट्रात 15 लाख डोस शिल्लक
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना प्रतिबंध लशीचे डोस संपल्याची बातमी काल आली होती. लशीकरण केंद्रांच्या बाहेर डोस संपल्याचे फलक लागले होते. मात्र, महाराष्ट्रात आतापर्यंत 15 लाख डोस शिल्लक असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. महाराष्ट्राला आतापर्यंत 1 कोटी 10 लाख डोस मिळाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरात या राज्यांनाच एक कोटीच्या वर डोस मिळाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 15 लाख डोस शिल्लक आहेत, त्याचे वितरण झाले तर डोस कमी पडल्याचे फलक लागणार नाहीत, असंही मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com