Pune Crime : बाणेरमध्ये घरफोडीत सव्वादोन लाखांचा ऐवज चोरी

देशपांडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले.
file photo
file photosakal

पुणे - बाणेर भागातील एका घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि २० हजारांची रोकड असा दोन लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी अक्षय देशपांडे (वय ३३, रा. गगनगिरी निवास, भैरवनाथ मंदिराजवळ, बाणेर) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

file photo
Mumbai News : डांबराच्या रस्त्यावर चक्क शेती...! संतप्त शेतकऱ्याने केली भाजीपाल्याची लागवड

देशपांडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून सोन्याचे दागिने आणि २० हजारांची रोकड चोरी करून चोरटे पसार झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com