थेऊर : न्यायालयात वाद सुरू असताना देखील शेतात अतिक्रमण करून दोन सख्ख्या भावांसह ५ जणांना शिवीगाळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तरडे (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक २४८ मध्ये गुरुवारी (ता.३१ जुलै) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.