Pune Crime : मांजरीमध्ये कॅनरा बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
Bank Robbery Attempt : मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तिजोरी उघडता न आल्याने चोरटे कागदपत्रे अस्ताव्यस्त करून पसार झाले.
पुणे : मांजरी खुर्द भागातील कॅनरा बँकेच्या शाखेत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी उघडता न आल्याने बँकेतील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.