Pune Latest News: पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करुन शिवीगाळ धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे..पुण्यातील भाजपचे खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाजप आमदार तापकीर यांनी थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले होते..Rajnath Mango: 'ऑपरेशन सिंदूर'साठी संरक्षण मंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक; विकसित केला 'राजनाथ आंबा'; जाणून घ्या खासियत .सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे..Ashok Saraf Viral Video: 'माझे काका!' भाचीकडून विमानात अशोक सराफ यांना खास उद्घोषणा, पद्मश्री मिळाल्याबद्दल केलं कौतूक.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर धुमाळ हा वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. आत्तापर्यंत तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्यांनाच शिवीगाळ केली. सहकारनगर पोलिसांनी आता कारवाई करत आरोपी शंकर धुमाळ याला अटक केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.