Pune Crime Branch Arrests Absconding Murder Suspect
Sakal
पुणे : खोपोली (जि. रायगड) येथील एका खून प्रकरणातील फरार आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-पाचच्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील तपासाला गती मिळणार आहे. काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० जानेवारी रोजी घडलेल्या गंभीर दुखापतीच्या एका गुन्ह्यात अरबाज ऊर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) हा प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते.