

Illegal Country-Made Pistol Seized in Pune
Sakal
पुणे, ता. २२ : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सिंहगड रस्ता परिसरात कारवाई करत एका अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत.