
पुणे : वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळविण्यासाठी भावाने माणुसकीला काळिमा फासत बहिणीला जबरदस्तीने मानसिक रुग्णालयात दाखल केले, तर वृद्ध आईला कोणतीही परवानगी न घेता वृद्धाश्रमात ठेवले. सिंध सोसायटी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, चतु:शृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहे.