Pune Crime NewsSakal
पुणे
Pune Crime News : भावा-भावातील वाद थेट खुनापर्यंत; ताम्हिणी घाटात सख्ख्या भावाने केला भावाचा खून
Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात सापडलेल्या मृतदेह प्रकरणात पोलिसांनी तपास करत सख्ख्या भावानेच खून केल्याचा उलगडा केला.
पुणे/माले : ताम्हिणी घाटात बेवारस आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. हृषीकेश शिर्के याचा खून त्याच्याच मोठ्या भावाने केल्याचे तपासात समोर आले आहे.