Pune Crime : गोकुळनगरमध्ये तरुणावर कोयत्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक
Crime News : कोंढवा गोकुळनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तलवारी व कोयत्यांनी हल्ला करून सात सराईत गुन्हेगारांना अटक व दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.
पुणे : पूर्ववैमनस्यातून गोकुळनगरमध्ये एका तरुणावर कोयते आणि तलवारींनी हल्ल्या केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.