Pune Crime: अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह, आई-वडिलांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Pune Latest Update:मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली.
Pune Crime
Pune Crimesakal
Updated on

Latest Pune News: आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्यामुळे पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली.

सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्‍सो), तसेच बालविवाह कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com