Crime News
Crime Newsesakal

Pune Crime : पोलिसांनी रचला सिनेस्टाईल सापळा; खंडणी मागणाऱ्याला 'अशी' केली अटक

Published on

पुणे - मागील काही दिवसांत पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने एकाला अटक केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. (Pune Crime News in Marathi)

Crime News
Aditya Thackeray : अखेर सामना ठरला! आदित्य ठाकरे-अमित ठाकरे येणार आमने-सामने

पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंट सचिन संपतलाल पारेख यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन 30 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सिने स्टाईल सापळा रचून अटक केली.

मागील महिन्यापासून अज्ञात फोन नंबरवरून WhatsApp वर मेसेज येतात. तसेच पैसे मागून पैस न दिल्यास मुलांना आणि त्यांना जीवे मारण्याची वारंवार धमकी मिळत असल्याची तक्रार सचिन पारेख यांनी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने पुणे महापालिकेजवळ खंडणीमध्ये मागितलेली रक्कम घेऊन सापळा रचला. मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने अनेक वेळा जागा बदलली.

Crime News
Asaduddin Owaisi : प्रकाश आंबेडकरांच्या ठाकरे गटासोबतच्या युतीवर ओवेसी म्हणाले, त्यांनी...

दरम्यान आरोपीने गरवारे ब्रिज खाली झुडपात बॅग ठेवण्यासाठी सांगून निघून जाण्यास सांगितले. काही वेळात तिथे एक जण आला. परंतु, पोलिस दिसताच त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले. किरण रामदास बिरादार (२४) असे त्याचे नाव असून तो लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील आहे

आरोपीने आतापर्यंत ४ ते ५ प्रतिष्ठित व्यक्तींना खंडणी साठी फोन केल्याचे, तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com