तू माझ्यासोबत राहशील का? म्हणत केला विनयभंग; आरोपीला ७२ तासांत शिक्षा

गुन्ह्यातील आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून ७२ तासांत शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Court
Court sakal

पुणे : फौजदारी किंवा दिवाणी स्वरूपाचे कोणतेही प्रकरण न्यायालयात गेले केले अत्याचार झालेल्यांना न्याय मिळण्यासाठी मोठा वेळ खर्च करावा लागत असल्याचे आपण बऱ्याचदा पाहतो. मात्र हिंजवडी येथे घडलेले विनयभंगाचे प्रकरण या सर्वांस अपवाद ठरले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून ७२ तासांत शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हिंजवडी परिसरात एका महिलेच्या राहत्या घरात घुसून तिच्या सात वर्षाच्या मुलासमोर एका हॉटेल व्यावसायिकाने महिलेची छेड काढत तिचा विनयभंग केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. २४ जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हिंजवडी परिसरात ही घटना घडली. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी समीर जाधव (वय ३१, रा. हिंजवडी) यास तत्काळ अटक केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे जमा करून त्यास दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात या गुन्ह्याची सुनावणी झाली. सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी पाच साक्षीदारांचे साक्ष नोंदविल्यानंतर बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण करत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सहा महिने सक्तमजुरी व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम संबंधित महिलेला देण्यात यावी. तसेच, दंडाची रक्कम न भरल्यास जाधव याला अतिरिक्त एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा ३६ तासांमध्ये पोलिस तपास करण्यात आला. त्यानंतरच्या ३६ तासात न्यायालयीन कामकाज झाले व आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

तु माझ्यासोबत राहशील का म्हणत केला विनयभंग :

जाधव याचे हॉटेल असून त्यात महिला चपात्या करण्याचे काम करते. तिचे घर हे हॉटेलपासून जवळ आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हा तिचा घरी आला. ‘तु माझ्यासोबत राहशील का?, बोलशिल का? असे म्हणत त्याने महिलेचा विनयभंग केला. तसेच हा, प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com