ED मध्ये कमिशनर आहे, दारुच्या दुकानाचे लायसन्स काढून देतो; ५७ लाखांना गंडा | Pune Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Fraud

ED मध्ये कमिशनर आहे, दारुच्या दुकानाचे लायसन्स काढून देतो; ५७ लाखांना गंडा

उंड्री : एक्साईज विभागात (ED) असिस्टंट कमिशनर असून, आयकार्ड दाखवून एफ.एल.२ दारू दुकानाचे लायसन्स काढून देण्याच्या बहाण्याने तब्बल ५७ लाख ९९ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या महिला-पुरुष अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ मार्च २०२० ते आजपर्यंत हडपसर-गाडीतळ फुरसुंगी, पुणे शहरात घडली. (Pune City Crime News)

रणजित अरविंद लोहार (वय ३९, रा. माळीनगर, अकलूज, जि. सोलापूर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटद्वारे माहिती

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला आरोपी महिला व पुरुषाने एक्साईज विभागात असिस्टंट कमिशनर असल्याचे सांगितले. आयडी दाखवून एफ.एल.२ दारूच्या दुकानाचे लायन्स काढून देतो, त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी बँक ट्रान्स्फरद्वारे ५७ लाख ९९ हजार रुपये घेतले.

दारूच्या दुकानाचे लायसन्स निघाल्याचे खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात आले, त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrime
loading image
go to top