Pune Crime : कामावरून मध्यरात्री घरी निघालेल्या कर्मचाऱ्यांना लुबाडले

फिर्यादी हे एका खासगी कंपनीत कामाला असून, शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घोलप आणि त्यांचे दोन सहकारी कंपनीतून घरी जात होते.
Pune Crime
Pune Crimesakal

Pune Crime - कामावरुन घरी निघालेल्या खासगी कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांना चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना हडपसर भागात पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली.

या प्रकरणी योगेश मोहन घोलप (वय २९, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime
Mumbai News : पांडुरंगाच्या दर्शनासाठी डबेवाल्यांनी घेतली एक दिवसाची सुट्टी; शुक्रवारी सेवा बंद

फिर्यादी हे एका खासगी कंपनीत कामाला असून, शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घोलप आणि त्यांचे दोन सहकारी कंपनीतून घरी जात होते. ते पुणे-सोलापूर रस्त्यावर बजाज शोरुमसमोर बसची वाट पाहत उभे होते. त्या वेळी चोरटे दोन दुचाकीवरून आले. त्यांनी या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून तीन मोबाईल आणि रोकड असा ५२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.

Pune Crime
Pune Accident : पुणे - सोलापूर महामार्गावर अपघात, 14 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com