Pune News : कोहिनूर मोबाईल शॉपी मधुन चोरीला गेलेले १३ लाख रुपये किंमतीचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune News : मोबाईल शॉपी मधुन चोरीला गेलेले १३ लाख रुपये किंमतीचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

राजेश कणसे

आळेफाटा - येथील कोहिनूर मोबाईल शॉपी मधुन चोरीला गेलेले १३ लाख रुपये किंमतीचे मोबाईल व इतर साहित्य पोलीसांनी तपास लावुन दुकानदाला परत देण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा (ता.जुन्नर)या ठिकाणी असलेल्या त्रिमुर्ती कॉम्प्लेक्स इमारतीत दि.५ डिसेंबर रोजी कोहीनुर मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोंडुन अज्ञात चोरट्यांनी रेडमी,टेकनो,ईनफिन्सिक सॅमसग आदी कंपनीचे १३ लाख १३ हजार ८९० रुपये किंमतीचे १४० मोबाईल व १ डी.व्ही.आर.मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये महागडे मोबाईल तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने आळेफाटा पोलिस स्टेशन चे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी पथके बनवुन हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना केल्या होत्या.

त्यानुसार तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पथकाने सदर गुन्ह्यांच्या तांत्रिक विश्लेषण करुन व गोपनीय माहीती मिळवुन त्यानुसार यातील अज्ञात आरोपींचा माग काढत ईश्वरालाल हिंमंतलाल इरागर वय ३२ वर्षे या नायगाव बाफना चाळ पालघर व महाविर जोरसींग कुमावत वय ३५ या.नायगाव बापाचा चाळ पालघर या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडील गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपींनी शाहीद अब्दुल सत्तार कपाडीया तसेच संजय यादव उर्फ म्हात्रे यांच्या सह गुन्हा केल्याची कबुली दिली होती.

त्यानुसार त्यांना दि.१७ डिसेंबर रोजी अटक केली होती.या गुन्ह्यातील आरोपी शाहीद सत्तार कपाडीया याने सदरचे चोरीस गेलेले मोबाईल हे दक्षिण आफ्रिका,नेपाळ,बांग्लादेश,या देशांमध्ये ममु या नावाने.भेंडी बाजार या ठिकाणी विकुन टाकले असुन चोरीचे मोबाईल विकून झालेली रक्कम १२ लाख तसेच मोबाईल दुकानातुन चोरलेली २ लाख ५० हजार रूपये त्याकडे मिळवुन आली व गुन्हायात वापरलेली ५ लाख रुपये किंमतीची गाडी एकुन १४ लाख ५० हजार मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला होता.

चोरीला गेलेले मोबाईल ची रक्कम आज कोहीनुर मोबाईल चे यांच्या ताब्यात आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या हस्ते देण्यात आली.

दरम्यान हा तपास करण्याची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीय गोयल ,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे,विनोद गायकवाड,पंकज पारखे,अमीत माळुंजे,नविन अरगडे,हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर,सुनिल कोळी, यांनी केली होती.

आळेफाटा येथील कोहीनुर मोबाईल शॉपी मधील चोरीला गेलेले मोबाईल मिळाल्यानंतर दुकान मालकला रक्कम देताणा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर