Baramati: बारामतीत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं आलं अंगलट

पोलिस आल्याचे पाहून वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेली मुले दिसेल त्या दिशेने पसार झाली.
Baramati: बारामतीत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं आलं अंगलट
Updated on

Pune Crime - बारामती शहरातील सातव चौकात वाढदिवसानिमित्त सार्वजनिकरित्या केक कापण्याच्या निमित्ताने जमलेल्या जमावापैकी चौघांना पकडून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे याच्या वाढदिवसानिमित्त सातव चौकात केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता,

Baramati: बारामतीत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं आलं अंगलट
Pune : शहर विकासाची 'मिसिंग लिंक '

अनेक मुले तेथे जमा झाल्यानंतर पोलिसांपर्यंत ही माहिती गेली. शहर पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी तातडीने हालचाली करीत येथे जमलेल्या जमावापैकी चौघांना ताब्यात घेत अटक केली.

Baramati: बारामतीत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं आलं अंगलट
Mumbai Crime : दादरमधील 'त्या' अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

पोलिस आल्याचे पाहून वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेली मुले दिसेल त्या दिशेने पसार झाली. सापडलेल्या चौघांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान 143,147,149,504 व 506 व क्रिमिनल अमेंडमेंट अँक्ट कलम सात अन्वये गुन्हा दाखल केला.

महाविद्यालयीन विदयार्थ्यांसह इतरांनीही रस्त्यात केक कापण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करतील, असा इशारा सुनील महाडीक यांनी दिला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचा-यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Action under MPDA
Inter-State Cannabis Smuggling Gang Busted by Pune Rural Police in Baramati
beating
solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com