pune crime gambling robbery police seized 27 lakh worth gold theft
pune crime gambling robbery police seized 27 lakh worth gold theftsakal

Pune Crime : जुगार खेळण्यासाठी घरफोडी, चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत

ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्यासाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली.

पुणे : ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्यासाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्व ५५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. मात्र, चोरीस गेलेली ११ लाखांची रोकड त्याने ऑनलाइन जुगारात उडविल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी त्र्यंबकराव तुळशीराम पाटील (वय ७५, रा. सांगवी रस्ता, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. मनीष जीवनलाल राय (वय २९, रा. कोहिनूर प्लॅनेट सांगवी रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचा फर्टिलायझर निर्मितीचा व्यवसाय आहे. त्यांच्या बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

याबाबत चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती काढून आणि तांत्रिक विश्लेषण करीत मनीष राय याला अटक केली. तो मूळचा मध्यप्रदेशच्या कटणी जिल्ह्यातील खमतारा येथील रहिवासी आहे.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

घरफोडीतील ११ लाख रुपये हरले जुगारात

आरोपीला मोबाईलवर ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्याची सवय आहे. जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने घरफोडी केली. परंतु घरफोडीत चोरलेली ११ लाख रुपयेही तो जुगारात हारला. तपासादरम्यान ११ लाखांची रोकड ऑनलाइन जुगारात हारल्याचे आरोपीच्या बँक स्टेटमेंटवरुन निष्पन्न झाले आहे. मात्र, चोरीस गेलेले सर्व ५५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com