
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) पोलिसांनी केलेल्या कारवाईतील गुन्हेगाराने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सहकारनगर पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालत पोलिसांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. दरम्यान, संबंधित गुन्हेगारास पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने हातातील बेडीने पोलिस ठाण्यातील टेबलावरील काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली.